असा झाला स्वच्छतेचा श्रीगणेशा…!

संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव एक आनंदोत्सव म्हणून साजरा करतो. त्यातही  पुण्यामध्ये साजरा होणारा गणेशोत्सव दरवर्षी सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. हलते देखावे, ढोल-ताशा पथके, गुलाल, रोषणाई, मिरवणुका यांनी संपूर्ण शहर सजलेले असते. परंतु, याच गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये रस्त्यांच्या कडेने पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, राहिलेले अन्नपदार्थ, रस्त्यावरचा इतर कचरा आणि घाण यांचे ढीग साठतात. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ऐन गणेशोत्सवात, संपूर्ण शहर रोषणाईने सजलेले असताना रस्ते मात्र कचऱ्याने वाहत असतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जनवाणीची ‘टीम आगळा वेगळा’, पुणे महानगरपालिका आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीसह जवळपास १०० गणपती मंडळे एकत्र आली. शहरभर पसरलेल्या या मंडळानी आपापल्या मांडवांतून जनवाणीच्या सहाय्याने लोकांना माहिती देणारे, जनजागृती करणारे फलक लावले आणि सगळ्यांनाच एक साधा पण महत्वाचा प्रश्न विचारला, “आपण घरात कचरा फेकतो का? मग रस्त्यावर का?”
banner_29aug_005-1
केवळ प्रश्न विचारून, नागरिकांना कचऱ्याच्या समस्येविषयी जागरूक करून, टीम आगळा वेगळा थांबली नाही. आपल्या घरातील ओला व सुका कचरा आगळा वेगळा ठेवण्याची एक सवय संपूर्ण शहर स्वच्छ ठेवू शकते, तसेच अशा आगळा वेगळा ठेवलेल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती होऊ शकते, अशी महत्वाची माहिती आगळा वेगळाची टीम लोकांपर्यंत पोहचवत होती.
 नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य, पपेट शो, चालता बोलता अशा विविध कार्यक्रमांतून लोकांना घर तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ओला-सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याचा सोपा उपाय सांगितला गेला. हे कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी कसबा गणपती, अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ, हिराबाग मित्र मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, हिंद तरुण मंडळ आणि साखळी पीर गणपती मंडळ यांसारखी गणपती मंडळे पुढे आली. या सर्व मंडळांच्या मांडावांजवळच हे सर्व कार्यक्रम आयोजित केले गेले. या कार्यक्रमांमुळे यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांना निश्चितपणे कचऱ्याचा प्रश्न व त्यावरील उपाय याची खात्रीशीर माहिती मिळाली.
hirabaug-street-play
हिराबाग गणपती मंडळापाशी पथनाट्य सदर करताना आगळा वेगळा ची टीम.
कचऱ्याचा राक्षस, त्याच्या वाढत्या प्रभावामुळे त्रस्त झालेले सामान्य लोक, वाढत्या कचऱ्यामुळे नाराज होऊन मांडवातून निघून गेलेला बालगणेश, त्याची समजूत काढणारी पार्वती, असे सर्वजण बाहुल्यांच्या रुपातून यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांना भेटले. मृदुला केळकर यांनी दिग्दर्शित केलेले, हे पपेट शो सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. पपेट शो मधून लोकांना कचरा ओला-सुका असा वेगळा ठेवण्याचे आवाहन केले जात होते. मराठी व हिंदी या दोन भाषांतून सादर झालेल्या, या पपेट शो मधून कचरा वर्गीकरणाचा संदेश खऱ्या अर्थाने पुणेकरांपर्यंत पोहचला.
img_2537
हत्ती गणपती येथे आगळा वेगळा टीम ने केलेला ‘पपेट शो’ ला प्रचंड प्रतिसाद मिळाला!
“कांद्याचे साल, ओला कचरा की सुका कचरा?”
“ओला कचरा”
अशा प्रश्नोत्तरांच्या ‘चालता बोलता’, या कार्यक्रमातून कचऱ्याच्या वर्गीकरणाविषयीच्या अनेक गैरसमजुती दूर करण्यात आल्या. आगळा वेगळाचे कार्यकर्ते कचऱ्याच्या वर्गीकरणाविषयीचे प्रश्न लोकांना विचारत होते आणि बरोबर उत्तर दिल्यास त्यांना गृहपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देत होते. ‘चालता बोलता’मधून साधलेल्या संवादातून नागरिकांना केवळ बक्षीसच नाही, तर ओला व सुका कचरा कसा वेगळा ठेवता येतो याचे योग्य मार्गदर्शन मिळत होते.
img_2525
हत्ती गणपती येथे ‘चालता बोलता’ हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेताना ‘आगळा वेगळा’ टीम चे कार्यकर्ते.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s