समस्येच्या मुळावर घाव घालणे आवश्यक!

14753477_1799975770217296_6197953357233151923_o

कोणतीही समस्या जेव्हा गंभीर होते त्याचवेळेला समाजाचे तिच्याकडे लक्ष वेधले जाते. पण जीवनात व समाजात अनेक समस्या असल्याने अगदीच डोक्यावरून पाणी जायला लागले कि आपण समाज म्हणून त्या समस्येकडे लक्ष द्यायला लागतो.

पण हेही खूप अल्पजीवी ठरते कारण जीवन थांबत नसते अशावेळेला हि समस्य सोडवण्यासाठी झपाटलेल्या व्यक्ती मात्र अथक काम करत असतात. त्यांचे हेतू चांगले असतात पण समस्या नीट कळली नसेल तर ती सोडवणे अवघड होते. काही वेळेला समस्या नीट कळलेली असते, सर्वंकषपणे मांडलेली हि असते पण तरीही सोडवताना नाकी नऊ येतात असे का होते याचा विचार करु.

समस्या जाणणारी माणसे कधी कधी उपाय घेऊन समस्या सोडवायला जातात, समस्येला तांत्रिक, सामाजिक. संरचनात्मक, भावनिक असे अनेक पैलू असतात. त्यामुळे समस्या गुंतागुंतीची होते. हे चक्रव्यूह भेदताना अनेकांची दमछाक झालेली असते. नविन विचार करणाऱ्या लोकांना अशी मंडळी अनुभव कथन करून नाउमेद करण्याची शक्यता असते.

अशावेळेला समस्येच्या मुळाशी जाऊन तिथे समस्या सोडवण्याचे काम करावे लागते. ‘A powerful strike at the roots will do the job,  which hundreds  hacking at the leaves will not’. Anthony J. D’Angelo.

आता या पार्श्वभूमीवर कचऱ्याची समस्या समजावून घेऊ. आपण वृत्तपत्रातून उरळी देवाची, देवनार इथल्या समस्यांविषयी बातम्या ऐकतो. तिथे राहणाऱ्या लोकांच्या स्थितीविषयी हळहळतो तेवढ्यात कोणीतरी कचरा माफियाविषयी हूल उठवतो आणि आपले लक्ष तिकडे जाते. मग कोणतीतरी भारी मशिनरी हा प्रश्न सोडवेल असा आशावाद पसरतो आणि आता काही कोटी खर्च केल्यामुळे हा प्रश्न सुटेल असे गृहीत धरून आपण आपले लक्ष इतर गोष्टींकडे वळवतो.

14615628_1799981236883416_6871816550685629595_o-1

एखादी गाठ कशी मारली गेली हे कळल्याशिवाय ती सोडवायची कशी हे समजत नाही. त्यामुळे हि समस्या मुळापासून समजून घेऊ. कचऱ्याचा प्रश्न आताच का प्रकर्षाने जाणवतोय? इतक्या शतकापासून माणसाची वस्ती आहे फार कशाला आजपासून ५० वर्षापूर्वी हा प्रश्न म्हणून कधी जाणवला नाही. त्यामुळे वरकरणी हा वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला प्रश्न आहे असेही वाटू शकते. पण नीट पाहिलं तर हा प्रश्न मिश्र कचऱ्यामुळे गंभीर झाला. प्लास्टिक चा शोध आणि त्याचा अमर्याद वापर यानंतरच याचे स्वरूप गंभीर होताना दिसल्यामुळे साहजिकच सगळा राग प्लास्टिक वर निघाला. ज्या प्लास्टिक ने मानवाला मोठी सोय दिली त्या प्लास्टिक वर बंदीची कुऱ्हाड आली.

कचऱ्याच्या प्रश्नात सगळ्यात महत्वाचा भाग हा dumping ground चे वाढत चाललेले साम्राज्य हा आहे. याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात हवा, पाणी, जमीन याचे भयंकर प्रदूषण होते आणि घाणीच्या साम्राज्यामुळे जीवाणू, विषाणू आणि इतर प्राण्यांचा प्रादुर्भाव होऊन आजूबाजूच्या वस्तीतील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आता तर ग्रामीण भागांचीही छोटी छोटी dumping grounds हि आपल्याला हमरस्त्यावर दिसू लागली आहेत.

Dumping ground ला कचरा जाऊ नये त्यावर प्रक्रिया व्हावी म्हणून महाग यंत्रसामुग्री आणली जाते. पण आज देशभरात अशी यंत्रसामुग्री बंद अवस्थेत किंवा अतिशय नगण्य कार्यक्षमतेने काम करताना दिसते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्यांना मिळणाऱ्या कचऱ्याची प्रत. तसेच कचऱ्याचा प्रश्न हा स्वच्छतेशी मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे. काही गावांमध्ये परिणामकारक स्वच्छता होताना दिसते. पण हा कचरा दृष्टीआड केला जातो परत dumping ground वर.

खरा तर कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा असल्यास दोन्हीवर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर होऊ शकतो किंवा उर्जा निर्मिती होऊ शकते. यासाठी प्रत्येक दारी जाऊन ओला आणि सुका असा वेगळा ठेवलेला कचरा गोळा करून वेगवेगळी वाहतूक केल्यास हा मोठ्ठा प्रश्न निश्चित सुटणार आहे. मात्र प्रत्येक घरानी ओला न सुका कचरा वेगवेगळा ठेवावा आणि महापालिकेने तो वेळेवर आणि नियमित वेगवेगळा नेण्याची सोय करायला हवी. हे झाल्यामुळे हा प्रश्न मुळापासून सुटणार आहे. मग रस्त्यावर जाता येताना पडणाऱ्या कचऱ्यावर ठिकठिकाणी ओल्या व सुक्याच्या कुंड्या ठेऊन उपाय होऊ शकतो.

मात्र काचऱ्याबाबत  चर्चा होताना रस्ते स्वच्छ दिसणे, प्लास्टिक बंदी, घरात ओला कचरा जिरवणे अशा मूळ उपाय झाल्यानंतर करायच्या कृतींवर आपण फार चर्चा करतो आणि हे उपाय साहजिकच अल्पजीवी ठरतात आणि समाज अधिकाधिक निराशेच्या रस्त्यावर जातो. याऐवजी एकदा कचरा वेगवेगळा येऊ लागला की या समस्येच्या मुळावरच घाव घातला जाईल आणि मग इतर छोट्या छोट्या समस्यांच्या फांद्या आपोआप गळून पडतील.

-किशोरी गद्रे, सल्लागार, जनवाणी

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s