चला शहर स्वच्छ करू!

ठिकठीकाणी साठलेले कचऱ्याचे ढीग, रस्त्यावर कुठेही पडलेला कचरा, रिकाम्या आणि मिळेल त्या आडोश्याला टाकलेला कचरा, ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या, ठिकठीकाणी कचरा वेगवेगळे करत बसणारे कचरा वेचक, असे चित्र, स्मार्ट पुण्याचे नक्कीच असू शकत नाही.

कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन कसे करावे, हा पुण्याचा आणि संपूर्ण देशाचाच एक प्रमुख प्रश्न असून, तो सोडविण्यासाठी, पुण्यातील स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक गणपती उत्सव मंडळे आणि माध्यमसंस्था एकत्रितपणे पुढे आल्या आहेत. हे अतिशय उत्साहवर्धक चित्र असून, हे प्रयत्न, एक महत्वाचा प्रश्न समाधानकारक निकालात काढणारे आहे. कोणतेही नवे कार्य सुरु करण्यासाठी गणेशोत्सव हे उत्तम माध्यम असून, त्याद्वारे शहर स्वच्छ करण्याची जनचळवळ उभारण्याची वेळ आली आहे.

14753475_1799973256884214_8159216327805805706_o.jpg

पुणे महानगरपालिका, ‘जनवाणी’, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे, ‘आदर पूनावाला क्लीन सिटी’(एपीसीसी) ‘स्वच्छ सहकारी संस्था’ एकत्र आल्या असून, पुण्याचा कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी, या संस्था एकत्रितपणे प्रयत्न करीत आहेत.

‘जनवाणी’, या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चर (एमसीसीआय)ने प्रवर्तित केलेल्या स्वयंसेवी संस्थेने, चार वर्षांपूर्वी कात्रज येथे शून्य कचरा प्रणालीची सुरुवात केली आणि वर्षभर केलेल्या कामातून, घनकचरा व्यवस्थापनाचे एक यशस्वी प्रारूप तयार केले. तेच प्रारूप आता संपूर्ण शहरामध्ये वापरण्यास सुरुवात झाली असून, लोकसहभागातून कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.

मानव निर्मित कचरा म्हणजेच सुका कचरा. निसर्गनिर्मित कचरा म्हणजेच ओला कचरा. सुक्या कचऱ्यामध्ये वेगवेगळी वेष्टने, कागद, प्लास्टिक, टिश्यू पेपर, कॉस्मेटिक डबे अशा सगळ्या वस्तूंचा यामध्ये समावेश होतो. बॅटरी, इलेक्ट्रिक वायर, वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, नादुरुस्त संगणक, टीव्ही-रेडीओ, या सगळ्यांचा समावेश इ-कचऱ्यामध्ये होतो. सॅनिटरी नॅपकीन, औषध-गोळ्या यांचा समावेश बायो मेडिकल कचऱ्यामध्ये होतो. यांशिवाय धातू, काचा, खिळे या सगळ्या वस्तू धोकादायक कचऱ्यामध्ये येतात.

कचरा ज्या ठिकाणी, तयार होतो, त्याच ठिकाणी तो ओला आणि सुका असा वेगळा ठेवल्यास, कचऱ्याचा ९५ टक्के पुन्हा उपयोग करता येतो, हे अनुभवातून सिद्ध झाले आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून, वीज, गॅस तयार करता येतो. तर सुक्याचा उपयोग अनेक प्रकारे होतो. त्यामुळे बहुतांशी कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि कचरा योग्य प्रकारे नष्ट करता येतो. यामुळे पुण्यात कचरा टाकून, उरुळीमध्ये निर्माण झालेले कचऱ्याचे डोंगर टाळता येतील. शहरभर पसरणारा वास टाळता येईल. शहर स्वच्छ होईल, डासांना प्रतिबंध करता येईल. पुण्याची नदी पुन्हा छान दिसेल. अनेकांना रोजगार मिळेल आणि कचऱ्यातून नवनिर्मिती करता येईल.

‘आदर पूनावाला क्लीन सिटी’(एपीसीसी)तर्फे पुण्यातील रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभारण्यात आली असून, त्यासाठी स्वयंचलीत वाहने, रस्ता स्वच्छ करीत आहेत. ही वाहने गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपती मंडळांच्या बरोबर काम करणार असून, त्याद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे. पण या यंत्रांचा वापर जितका कमी होईल, तितकी, शहर स्वच्छतेची मोहीम फत्ते झाली असे म्हणता येईल.

विद्येचे माहेरघर असणारे, पुणे हे आधुनिक विचारांचे शहर असून, आता वेगाने प्रगतीच्या मार्गावर धावत आहे. पण कोणत्याही आधुनिक शहराप्रमाणे पुण्याचेही काही प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे. तर आणि तरच पुणे, हे खऱ्या अर्थाने एक ‘स्मार्ट’ आणि संपूर्ण देशाला दिशा देणारे शहर म्हणून पुढे येईल. आपल्याला यानिमित्ताने दोनच गोष्टी करायच्या आहेत, एक म्हणजे आपला घरातील कचरा, ओला आणि सुका असा वेगवेगळा ठेवायचा आणि तो वेगवेगळाच द्यायचा आणि दुसरे म्हणजे, रस्त्यावर कचरा टाकायचा नाही. आपण केवळ आपला परिसर स्वच्छ ठेवला तरी सगळे शहर स्वच्छ होईल. चला या मोहिमेची सुरुवात करूयात!

यासाठी ‘जनवाणी’ने ‘आगळा वेगळा’, या नावाने मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये सहभागी होऊयात, पुण्याला अंतर्बाह्य स्वच्छ करूयात!

-अरुण फिरोदिया, अध्यक्ष, कायनेटिक समूह, विश्वस्त, ‘जनवाणी’

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s