‘शहराच्या स्वच्छता मोहिमेत प्रत्येक नागरिकाची महत्वाची जबाबदारी आहे’

जनवाणी, पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ यांच्यातर्फे चालू केलेल्या आगळा वेगळा या मोहिमेअंतर्गत अनेक मान्यवरांनी पुणेकरांना कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन केले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीही या मोहिमेला पाठींबा देत आपले मत व्यक्त केले.

bod7

जनवाणी, पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ यांचा हा उपक्रम अत्यंत उत्तम आहे. आपल्याला माहित असेल, मी स्वच्छ भारत कमिटीचा अध्यक्ष आहे. स्वच्छतेच्या या मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि ती खूप महत्वाची आहे.

मला आठवतं मला एका मित्रानी एक प्रसंग सांगितला होता. लहानपणी एकदा त्यानी त्याच्या आईला सांगितले, “ते बघ, कचरावाला आला.” तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, “तो कचरावाला नाही, आपण कचरावाले आहोत. कारण आपण कचरा करतो.” मला वाटतं आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं. कचरावाला न बनता, या स्वच्छतेच्या मोहिमेत आपण भाग घ्यायला हवा.

ओला आणि कोरडा कचरा वेगळा केला, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. तो कचरा जर पुढच्या काही कामांसाठी जसे की उर्जा निर्मिती इ. साठी वापरायचा असेल, तर त्याचे वर्गीकरण करणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. 

आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवं- हे छोटंसं काम करून प्रचंड मोठा फरक पडणार आहे.

 “कचरा वेगळा करा- ओला आणि कोरडा”

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s